आम्ही जातो आमच्या गावा , आमचा राम राम घ्यावा |
राम राम घ्यावा , आमचा राम राम घ्यावा ||
आम्ही जातो आमच्या गावा , आमचा राम राम घ्यावा |
राम राम घ्यावा , आमचा राम राम घ्यावा ||
तुमची आमची हेची भेटी , येथूनीय जन्म तिथी |
येथूनीय जन्म तिथी , येथूनीय जन्म तिथी ||
आता असो द्यावी दया , तुमच्या लागतसे पाया |
तुमच्या लागतसे पाया , तुमच्या लागतसे पाया ||
येता नजधामी कोणी , विठ्ठल विठ्ठल बोला वाणी |
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी , विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ||
राम कृष्ण मुखी बोला , तुका जातो वैखुंठाला |
जातो वैखुंठाला , तुका जातो वैखुंठाला ||
पांडुरंग हरी , पांडुरंग हरी , पांडुरंग हरी , पांडुरंग हरी , पांडुरंग हरी ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा