शतकांच्या यज्ञयातून उटली एक केशरी ज्वाला , दहा दिशांच्या हुर्दयामधूनी अरुणोदय झाला |
शिवप्रभूची नजर फिरी अन उठे मुलुखं सारा , दिशा दिशा भेदीत धावल्या खडकांच्या धारा |
हे तुफान स्वातंत्र्याचे , हे उधान अभिमानाचे , हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला , दहा दिशांच्या हुर्दयामधूनी अरुणोदय झाला |
कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान , जाळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण |
रायगडावर हर्ष दाटला , खडा चैगडा झडे , शिंगाच्या ललकारी वरती भगवा झेंडा उडे ||
शिवराय भाग्य देशाचे , हे संजीवन प्राणांचे , हे रूप शक्ती उक्तीचे
हाती तेजाचा झोप उफाळून सृष्टीतून आला, दहा दिशांच्या हुर्दयामधूनी अरुणोदय झाला |
गंगा सिंधू यमूना गोदा कलशातून आल्या , शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या |
धिमि पावले टाकीत येता, रुद्राचा अवतार , अधिर हुद्रयातुनी उमटला हर्षे जयजयकर
शिव छत्रपतीचा जय हो , श्री जगदंबे चा जय हो , या भरत भूमीचा जय हो
जय जयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला , दहा दिशांच्या हुर्दयामधूनी अरुणोदय झाला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा