मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२


पहिला फोन कॅल  -

सोमवार चा दिवस होता ,  असे म्हणतात कि " Monday ला ऑफिस मध्ये लवकर जावे . " आणि तसे असायलाच पाहिजे . atleast Monday ला तरी ऑफिस बद्दल काही तरी वाटले पाहिजे . कामा बद्दल सदैव इच्छा असली पाहिजे असे दादा नेहमी म्हणतात . दादा म्हणजे आमचे Father. वडिलांना Father असे म्हणायचे  असे मी पु ल च्या वाक्यतून घेतलं .

असो , ऑफिस मध्ये सकाळचा नाश्ता करून ...
ऑफिस बद्दल काही तरी वाटायचे अजून एक कारण आहे कि ऑफिसात  Monday to Friday खूप मस्त जातात . ऑफिस मध्ये यायचे मस्त नाश्ता जेवण चहा या गोष्टी सदैव मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ऑफिस .

काल माझे लग्न जमले . हो $$य   हो काल म्हणजे १८ मार्च २०१२ . पाटील म्हणून पाहुणे आहेत किल्लारी , लातूर चे . मी मुलीला पुण्यात पहिले होते फेब्रुवारी २०१२ मध्ये . [ ' मुलीला ' असे उल्लेख करणे बरोबर नाही . कारण त्या आता माझ्या ' प्रिऊ' झाल्या आहेत . ]  त्यानंतर आम्ही सगळे म्हणजे घराचे लातूर ला जाऊन भेटून आलो .   त्यानंतर बरेच दिवस त्यांचे  काही उत्तर आले नव्हते . बहुदा चौकशी करत असावेत केव्हा पसंत हि नसावेत .

पण त्यांच्या चौकशीचे बरेच कानावर आले होते . म्हणजे बहुदा पसंत असावेते . अशी आमची समजूत .
या सगळ्या चौकशी बद्दल केव्हातरी लिहीन .
तर, रविवारी  ते लोक घरीयून  लग्नाची बैठक वगैरे झाले सगळे . जेवणं संपून ते सर्व लोक गेले . आम्ही पण पुण्याला निघालो घरून - Monday ऑफिस या नियमाप्रमाणे . त्यावेळी असे काही वेगळे वाटत नव्हते .ठीक आहे जमलं Ok !

ऑफिस मध्ये नाश्ता वगैर करून चहा पीत होतो तेव्हा एक फोन आला . मी सोमनाथ पैलवान यांशी  बोलू शकते का ? मी म्हणालो हो !! मी प्रियांका पाटील ची बहिण बोलती आहे . अभिनंदन भाउजी !! बोललात का नाही आमच्या बहिणीशी ! मी म्हणालो नाही ! नंतर त्या म्हणाल्या फोन number आहे का तिचा ? मी म्हणालो नाही !! त्या म्हणाल्या मी sms करते तुम्ही करा फोन ? मी म्हणालो OK !

फोन ठेवल्यानंतर मला कळले कि याच त्या ज्यांच्या कडे मी पहिल्यांदा  मुलीला  पाहायला गेलो होतो .  मी संभ्रमात पडलो काय करायचे या फोन number चे . मी काही केले नाही . ऑफिस मध्ये desk वर गेलो आणि कामात गर्त होण्याचा प्रयत्न करू लागलो . पण सतत त्या SMS मधल्या फोन NUMBER चि आठवण होत होती . मग मी उठलो DESK वरून आणि ऑफिस मध्ये एका एकांत ठिकाणी गेलो . ओफ्फिच मध्ये PANTRY केव्हा CONFERENCE रूम चा एकांत ठिकाण म्हणून उपयोग करू शकतो .

आणि तो फोन NUMBER Dial केला ८८०६०७४०४० . दोन - तीन दा रिंग वाजली आणि तिकडून आवाज आला
' Hello ' . फोन NUMBER Dial करण्यापासून च छातीत थडथड होत होती . पण तो ' Hello ' आवाज ऐकल्यावर काही क्षण कळलेच नाही . मी स्वतःला सावरून म्हणालो .
' नमस्कार मी सचिन पैलवान बोलतोय ! सोमनाथ पैलवान '. मला दोन नावे आहेत कागदोपत्री 'सोमनाथ ' आणि घरी - मित्रात 'सचिन '. बहुदा त्यांना कळले असावे . त्यामुळे मी त्या दोन नावाच्या प्रश्नात पडलो नाही .
आणि म्हणालो ' नमस्कार काल आपले लग्न ठरले आहे ! अभिनंदन ! Congratulation !' . बहुदा त्या लाजल्या असाव्यात . तिकडून पण मला congratulation मिळाले . नंतर मी त्यांना फोन Number कोणी दिला या बद्दल सांगितले . नंतर चे काही एवढे आठवत नाही . कारण जवळ जवळ ३० minute मी बोललो असावे . मी त्या फोन  NUMBER चे पण विशेष बोललो . छान NUMBER आहे हा ८८०६०७४०४० .
त्यानंतर मी त्यांना विचारले - तुम्हाला हे जमलेले आवडलेना !! म्हणजे मी आवडलो ना तुम्हाला ! त्यांनी थोडं थांबून उत्तर दिले . बहुदा काय उत्तर द्यावे हे कळले नसावे एकदम ! असो त्यांनी पण मला शेवटी तोच प्रश्न विचारला . मी ' बरं ' असे उत्तर दिले . त्यांना ते पटले नसावे . कारण नंतरच्या बऱ्याच फोन कोल कॅल मध्ये 'बरं ' या शब्दाबद्दल स्पष्टीकरण ध्यावे लागले .

    


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा