गुरुवार, १७ जून, २०१०
माणसापरास मेंढरं बरी
वर आभाळ खाली धरती , दिस आल्याय माथ्या वरती
अल्याड डोंगर पल्याड डोंगर , मधीच ख्योल ख्योल दरी
जरा जपून चालगं पोरी
गेली सांगून ज्ञानेश्वरीन , माणसापरास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरीन , माणसापरास मेंढरं बरी
त्याला खायाला दील तर खातय, नाही दील तर उपाशी रातय
दील हाकलून माघारी येतय , काय बोलत न्हाय काय मागत न्हाय
जीव लवतय मालकावरी,
जीव लवतय मालकावरीनी , मानसापरास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरीन
गेली सांगून ज्ञानेश्वरीन , माणसापरास मेंढरं बरी
कस पळतया लाड-लड , तूला दीसतया न्हाही,
मला बीलगून बसतया येड, तूला कळतया न्हाही,
माझ्या तोंडाला लावतया तोंड, तूला जूळतया न्हाही,
किती आंजारल किती गोंजरल ,
त्याला ऊट्च न्हाही शीर शरी
त्याला ऊट्च न्हाही शीर शरी, मानसापरास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरीन
गेली सांगून ज्ञानेश्वरीन , माणसापरास मेंढरं बरी
तूला पहिल्याच फटक्यात धरलय, ठेव ध्यानत ग
तवा पासून टटकूर फिरलय, ठेव ध्यानत ग
मोठ्या हितम्तीन आज धरलय, आडरानात ग
जीव लावून अशी म्हॊर जातीस कशी,
ववी गातूया म्या धनगरी
ववी गातूया म्या धनगरी , मानसापरास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरीन
गेली सांगून ज्ञानेश्वरीन , माणसापरास मेंढरं बरी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा