शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१०

मी रोज सायकल वरून ऑफिसला येतो अणि  जातो सुद्धा. मी का येतो  ऑफिसला ? याची बरीच कारणे  आहेत. मी काही सायकलिंग प्रमोट करण्यासाठी   करत नाही कारण मी कोणी सेलेब्रिटी किंवा  सायकल कंपनीचा मालक नाही.
सायकल चालवण्यात  माझा काही स्वार्थ आहे.

मार्ग - स्टेट बॅंक नगर -> चिंतामणी नगर -> महेश सोसायटी -> सिटी प्राइड -> अरण्येश्वर -> सारस बाग -> सणस मैदान   -> स. प. कॉलेज -> अलका चित्रपट गृह   -> गुड लक उपहार गृह -> रानडे  इंस्टिट्यूट .
रानडे इंस्टिट्यूट जवळ माझे ऑफिस आहे.

एकुण - ११ किलो मीटर .
११ किलो मीटर येण्याचे अणि ११ किलो मीटर जाण्याचे. तब्बल २२ किलो मीटर होते रोज.

सायकल वरून येण्याची कारणे -  [ ३ टप्प्यात वर्गीकरण ]
 शारीरिक कारणे-
          १. चांगलाच व्यायाम होतो रोज.
          २. नियमित सायकल वापरत असल्याने ट्रेकिंगच्या वेळेस
               बाकी मित्रापेक्षा दम कमी लागतो.
          3. एकुणच प्रसन्न वाटते रोज ऑफिस मधे.
ऑफिस कारणे -
         १. ऑफिस मधे आपली प्रतिष्ठा वाढते.
         २. चार चौघांना ऑफिसमधे विषय मिळतो बोलायला .
         ३. ऑफिस मधल्या वरिष्ठांची सहानभूति मिलते.
         ४.  फ्रेशेरने तर अवश्य सायकलचा वापर करावा.
              ऑफिसमधे थोड़ी पब्लिसिटी मिळते.
         ५. ऑफिसला उशिरा येण्याचा अणि लवकर जाण्याची
              संधी मिळते.
सामाजिक कारणे -
          १. सायकलमुळे खर्च कमी होतो. विशेष म्हणजे  - मित्र 
               आपल्याला घेण्यासाठी व भेटण्यासाठी ऑफिसकड़े  येतात.
          २. कोणी पाहुणे घरी येणार असतील तर त्याना न आणणयासाधी
               खुप चांगले कारण मिळते - ' मी आज सायकल  घेउन ऑफिसला
                आलो आहे. तुम्ही बस किवा रिक्षा करून घरी जावे '

बस आता ! एवढे ठीक आहे.
वाचकाच्या प्रतिक्रिया अपेक्षित !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा