कालच्याच रविवार दुपारची गोष्ट , मी ऑफिसला आलो होतो. हो रविवारी सुद्धा !
कारण दुपारच्या जेवणाचे माझे साध्य हाल होत आहेत.
विशेष करून शनिवार अणि रविवारी ! विक डेज मधे ऑफिसला जेवण मिलते. पण शनिवार अणि रविवार चे मिळत नाही. शनिवार कसा तरी घालवतो मोंग्गी वगेरे खाउन. पण रविवारी दुपारी सहन होत नाही भूख.
म्हणून मी ऑफिस जवळील 'सुवर्ण-रेखा डायनिंग होंल ' जेवनासाठी सायकल वरून आलो होतो. जेवण अप्रतिम होते - जिलेबी , मट्ठा, मसाले भात , गरगाठठा .
भरपूर जेवलो अगदी आईच्या म्हाहणणय प्रमाणे - ' नरड्याला येई पर्यंत ' .
मग हुक्की आली पान खायची. जवळच्या पानवाल्याला सांगितले ' एक मसाला पान दे रे !' [जरी पानवाला - भैय्या सारखा दिसत असला तरी , राजसाहेबांच्या म्हाणण्या प्रमाणे मराठीच बोला] . ह्या पानवाल्याने आयते तयार केलेले पान देण्याचे केले . तयार करून बर्फाच्या लाल किवा निळ्या पेटीत ढेवलेले पान मला आवडत नाही. असल्या पानामधे रसरशीत पणा कमी असतो , जे आपल्या समोर केलेल्या पान प्रमाणे नसतो. असो. त्या साल्याने पान करून देणार नाही असे म्हणल्यावर एक दोन शिव्या मनातल्या मनात देऊन , मी सायकल वर टंग मारली घराच्या दिशेने.
रविवार असल्याने रास्त्ता बराच सा रिकामा होता. मनात आले म्हणून मोबाइल च्या रेडियो वर विविध भारती लावले अणि हेड सेट लाउन ऐकु लागलो. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चालू होता. तेवढयात एक गाणं लागले .
पिकल्या पानाचा , अहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा sss .
' स्वरगंध ' या अल्बम मधलील हे गाणे स्वर्गीय श्रीमती शोभा गुर्टू यांचे हे गाणे .
अप्रतिम गाणे आहे ते. गाणे इतके सुंदर आहे की - पान न खता , पान खात असल्याचा आनंद मिळत होता.
प्रत्येक कढव्याला , पान खाउन संपताना जे शेवटचे मिश्रण तोंडात कसे लगते त्या प्रमाणे ते गान्याचे कढवे लगत होते.
गाण्यातील शब्द -
अल्बम - स्वरगंध [ शोभा गुर्तु ]
गायिका - शोभा गुर्तु
संगीतकार - राम कदम
गीतकार - जगदीश खेबुडकर
दरबार जुना ह्यो हंड्या झुम्बर नवं
मध्यंह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगअंगी मी रंग खेलते केसमधी मालवा
पिकल्या पानाचा , अहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा
नख लागलं बेतानं खुडा ,
हो नख लागलं बेतानं खुडा
केशरी चुना अनं कात केवडा
लई दिसाण रंगल विठा
व्हटाची लाली टिपून ग्याय
मुखड़ा असा फिरवा
पिकल्या पानाचा , अहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा
थोड़ी झोकुन थोड़ी वकते
पडला पदर लाज झाकते
नेम धरुनी बाण फेकते
तुमची माझी हौस इश्काची
हलू हलू पुरवा
पिकल्या पानाचा , अहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा
गाणे ऐकण्यासाधी लिंक - पिकल्या पानाचा
मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा